"DATTA KRUPA"

21/03/2013 12:59

मातृ देवो भव, पितृ देवो भव.

'गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु,
गुरुर्देवो महेश्वरः,
गुरु: साक्षात परब्रम्ह
'तस्मै श्री गुरुवे नमः'
आज गुरुपौर्णिमा. म्हणूनच माझा पहिला नमस्कार माझ्या आई-दादांना. हो माझे पाहिले गुरु तेच आहेत!
जिने अनंत यातना सहन करून, मला या सुंदर पृथ्वीवर जन्म दिला, ती आई, आणि अनेक काबाड-कष्ट करून मला वाढवल, त्या दादांना (माझे वडील) माझा नमस्कार.
माझे वडील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांचा स्वभाव अतिशय साधा. साधा म्हणजे इतका साधा, त्यांच्या ताटातील एखादा पदार्थ कोणी घेतला तरी ते बोलणार नाहीत. त्यानी शेती करता करता, आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही .

आई-दादानी आमच्यावर खूप छान संस्कार केले. (माझ्या वडिलाना व आम्हाला कोणालाच कसलेही व्यसन नाही. यचे सर्व श्रेय त्यानाच आहे.) आईने आम्हला लहानपणापासून सगळी कामे करायला शिकवले. ती नेहमी आम्हाला सांगत असे."तुमचे वडील तुमच्यासाठी दिवस रात्र राबातायत. तुम्ही पण जमेल तेवढी मदत केली पाहीजे." तिने आम्हाला स्वावलंबी बनवले.  असे हे माझे प्रेमळ आई-दादा. तो कालखंड आमच्या कुटुंबाची अगदी सत्त्वपरिक्षा घेणारा ठरला. पण माझ्या आई-दादांनी न डगमगता खंबीरपणे सर्व प्रसंगाना तोंड दिले..
“रक्ताचे पाणी करून आम्हा भावंडासाठी सुखाची पखरण करणार्‍या अशा या माझ्या वंदनीय आई-दादांना कोटीकोटी प्रणाम!”