प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान,,,,,,,,,,,,,,,

12/04/2013 11:31

१) सुरुवात कशी  झाली यावर  बऱ्याच घटनांचा शेवट  अवलंबून असतो.
    २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे  असते.
    ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
    ४) जग  प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने  नाही.
    ५) यश  मिळवायचं असेल तर  स्वत:च  स्वत:वर  काही बंधन  घाला.
    ६) प्रत्येकाच्या मनात  एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
    ७) ज्याने स्वत:चं मन  जिंकलं त्याने जग  जिंकलं.
    ८) यश  मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी  शक्ती-आत्मविश्वास.
    ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच  खरा माणूस !
    १०) चुकतो तो माणूस आणि  चुका सुधारतो तो देवमाणूस !
    ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
    १२) छंद  आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
    १३) आपण  जे पेरतो तेच उगवतं.
    १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
    १५) उशीरा दिलेला न्याय हा  न दिलेल्या न्यायासारखा असतो.
    १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
    १७) प्रेम सर्वांवर करा पण  श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
    १८) आधी  विचार करा; मग  कृती करा.
    १९) आयुष्यत आई आणि वडील  यांना कधीच विसरु नका,
    २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि  स्वत:साठी  जगून दुसऱ्यांसाठी जगलास
  तर जगलास !
    २१) एकमेकांची प्रगती साधते ती  खरी मैत्री.
    २२) अतिथी देवो भव ॥
    २३) अपयशाने खचू नका; अधिक  जिद्दी व्हा.
    २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते  विसरा आणि सदैव  हसत रहा.
    २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख  होईल असे  कधीही वागू नका
    २६) निघून गेलेला क्षण कधीच  परत आणता  येत नाही.
    २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही  त्याच्यासाठी नवं
  काहीतरी शिकण्याची संधी असते.
    २८) उद्याचं काम आज करा  आणि आजचं  काम आत्ताच करा.
    २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
    ३०) नवं  काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
    ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज  म्हण्जे पुस्तक.
    ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
    ३३) जो  दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
    ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात  नाही.
    ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग  ती एखाद्या माणसाची असो वा
  पशुची !
    ३६) स्वप्न आणि सत्य यात  साक्षात परमेश्वर उभा  असतो.
    ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
    ३८) खरी  श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
    ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
    ४०) वाहतो तो झरा आणि  थांबते ते डबकं  ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
  राजहंस !!
    ४१) जो  गुरुला वंदन करत  नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
    ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली  असतं.
    ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
    ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
    ४५) क्रांती हळूहळू घडते; एका  क्षणात नाही.
    ४६) सहल  म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
    ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
    ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
   ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
    ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
      ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
      ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
      ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा  प्रकाश कुठुन कधी  येईल
  सांगता येत  नाही.
      ५४) आपल्याला मदत  करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
      ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी  स्वत:ला  ठेवून बघा.
      ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत  डोकावून पाहण्याची संधी  !
      ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
      ५८) जगण्यात मौज  आहेच पण  त्याहून अधिक मौज  फ़ुलण्यात आहे
      ५९) वाचन, मनन  आणि लेखन  म्हणजे अध्ययन.
      ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
      ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!
      ६२) संभ्रमाच्या वेळी  नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
      ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना  त्याच्या कित्येक
  पटीने देव  तुम्हाला देईल.
      ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा  मानव !
      ६५) स्वत:च्या  स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर  कधी करु  नका; आणि स्वत:चा
  वापर कुणाला करु देऊ नका.
      ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
      ६७) तुलना करावी पण अवहेलना करू  नये.
      ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं  सुख आहे.
      ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
      ७०) मनात आणलं  तर या  जगात अश्यक्य असं काहीच नाही.
      ७१) चेहरा हा  आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा  असतो.
      ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे  तो परिणाम स्वीकारा.
      ७३) आवडतं तेच  करू नका; जे  करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
    ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला  जास्त महत्त्व आहे.
    ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
    ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
  ७७) मरण  हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ  नका.
  ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण  प्रेमाचं प्रदर्शन करू  नका.
  ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
  ८१) तुम्ही जिथे जाल तिथे  तुमची गरज निर्माण करा.
  ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ  नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
  ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
  ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
  ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
  ८६) तुमची उक्ती आणि कृती  यात भेद  ठेवू नका.
  ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद  देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
    देतो पण  आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
  ८८) चांगला माणूस घडवणे हेच  शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
  ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
  ९०) उलटा  केलेला पिरॅमिड कधीच  उभा राहू  शकत नाही
  ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी  पोहऱ्यात जात नाही.
  ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
 
  ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
 
  ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय  - मौन !
 
  ९५) अती  अशा हे  दुःखाचं मूळ कारण  आहे.
 
  ९६) अंथरूण बघून पाय पसरा.
 
  ९७) कधी  कधी हक्क  मागून मिळत नाहीत; ते  मिळवावे लागतात.
 
  ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी  बोला, आणि ज्या  विषयाची
  माहिती नाही  त्या विषयी मौन पाळा.
 
  ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
 
  १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
 
   १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
 
  १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या  दृष्टीत असते.
 
  १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
 
  १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत  नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
 
  १०५) विद्या विनयेन शोभते  ॥
 
  १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
 
  १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी  स्वतःशी प्रामाणिक रहा.
 
  १०८) एकदा  तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
 
  १०९) कामात आनंद निर्माण केला  की त्याचं ओझं वाटत नाही.
 
  ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी  माया फ़ार  दूर्मिळ असते.
 
  १११) ज्या  चांगल्या बाबी आपण  निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार
  आपल्याला नाही.
 
  ११२) कुणीही चोरू शकत नाही  अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
 
  ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता  घेता एक  दिवस, देणाऱ्याचे
  हात घ्यावे !
 
  ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
 
  ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही  मूर्खपणाच !
 
  ११६) ज्या  गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की  तोटाच होतो.
 
  ११७) जे  झालं त्याचा विचार करू नका; जे  होणार आहे त्याचा विचार करा.
 
  ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो
  त्यांच्यावर प्रेम करा.
 
  ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
 
  १२०) जे  आपले आहेत  त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं;  पण जे  आपले नाहीत
  त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं  प्रेम !
 
  १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली  नसते.
 
  १२२) कधी  कधी आपण  ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर
  जातात.
 
  १२३) जे  आपले नाही  त्याच्यावर कधीच हक्क  सांगू नका.
 
  १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
 
  १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
 
  १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण  होतं !
 
  १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
 
  १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच  गुणांची पूर्तता !
 
  १२९) ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो  दिवस फुकट  गेला अस  समजा.
 
  १३०) जो  स्वतःवर प्रेम करू  शकत नाही  तो जगावर काय प्रेम करणार !
 
  १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
 
  १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव  दिसतो.
 
  १३३) आनंदी मन,  सुदृढ शरीर  आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं
  म्हणजे अमृत  मिळणं.
 
  १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण  काय करतो  यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
  दृष्टीकोन व्यक़्त होतो.
 
  १३५) प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
 
  १३६) आपण  चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
 
  १३७) आपला  जन्म होतो  तेव्हा आपण रडत  असतो आणि लोक हसत  असतात. मरताना आपण  असं
  मरावं की  आपण हसत  असू आणि  लोक रडत  असतील !
 
  १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली  की बरेच  अनर्थ टळतात.
 
  १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि  जुळतात.
 
  १४०) हक्क  आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 
  १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ  शकत नाही.
 
  १४२) बदलण्याची संधी नेहमी असते  पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
 
  १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
 
  १४४) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
 
  १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
 
  १४६) यश  न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
 
  १४७) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय  हरतं पण  बुध्दी जिंकूनही हरलेली असते
  आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
 
  १४८) खरं  आणि खोटं  यात केवळ  चार बोटांचं अंतर आहे. आपण  कानांनी ऎकतो ते  खोटं
  आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
 
  १४९) जगी  सर्व सुखी  असा कोन  आहे; विचारी मना  तुच शोधूनी पाहे.
 
  १५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
 
  १५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
 
  १५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
 
  १५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ  हानी,
  प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान  समजाव्यात.
 
  १५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
 
  १५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
 
  १५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य  नव्हे.