`श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप "

21/03/2013 16:30

खादी व्यक्‍ती `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी', अशी तीव्र तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.

 

         `असे जर आहे, तर बहुतांश पूर्वज नामजप करणार्‍या वारसदारालाच लक्ष्य का करतील', असा प्रश्‍न कुणालाही पडू शकेल. याचे उत्तर असे आहे - `स्वत:ची आध्यात्मिक प्रगती व्हावी', अशी इच्छा असणारे पूर्वज साधना करणार्‍या वारसदारांकडून साहाय्य घेतात आणि ज्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छा भौतिक विषयांशी निगडित असतात (खाणे-पिणे आदी), ते पूर्वज त्याच प्रकारच्या वासना असणार्‍या वारसदारांकडून साहाय्य घेतात.

दत्त शिखराचा राजा । त्यासी नमस्कार माझा ।

दत्त शिखरा वरुनी येतो । यात्रा सांभाळुनी नेतो ।

दत्तु पूजावा अखंड । सर्व सोडावे पाखंड ।

दत्त पुजावा नेमाचा । फेरा चुकेल यमाचा ।

दत्त माझे माय बाप । चुकेल चौर्‍यांशीची खेप ।

दत्त माझे माता पिता । कुळ उद्धारील आता ।

एका जर्नादनी श्री दत्त । भवसागर करील मुक्त ।

गोत्र म्हणजे

वंश परंपरागत आपण ज्या ऋषींच्या कुळात जन्माला आलो आहोत त्या ऋषिंचे नांव, म्हणजे समजा काश्यप ऋषी ...त्यांची पुढची पीढी ..... अशी सायकल पण मुळ पुरुष जे ऋषी त्यांचे नांव म्हणजे गोत्र असे वाटते. आणि ज्यांना आपले गोत्र माहित नाही त्यांनी "काश्यप" गोत्र लावावे अशी प्रथा आहे. कदाचित काश्यप ऋषींनी ही जबाबदारी त्या काळात घेतली असावी (म्हणजे एक प्रकारे अनाथांचा सांभाळ करण्याची)

आपले गोत्र आणि वंशावळ त्र्यंबकेश्वर येथील गुरुंजीं कडे नक्कीच मिळते. लग्न ठरवतांना गोत्र बघितले जाते म्हणजे सगोत्री विवाह होत नाही ... सगोत्री म्हणजे एकाच वंशातले म्हणजे त्यांचं नातं बहिण भावडांचच ! म्हणून सगोत्री विवाह होत नाही, आणि पुढे जाऊन अपत्यप्राप्तीच्या बाबतीतही समस्या निर्माण होतात यामध्ये पत्रीकेतील 'नाडी' हा विषय देखिल तितकाच महत्वाचा मानला जातो.

 

 

गोत्र - सांप्रत आपलें नांव सांगतांना आपण स्वतचें, वडिलांचें नांव व शेवटीं आडनांपूर्वी गोत्रावरून वंश व सूत्रावरून उपशाखा कळत असे.

गोत्र शब्दाचा अर्थ कळप वा कुल. गोत्र ऋषि म्हणजे कुलप्रमुख. ज्या त्या गोत्रांतील लोक म्हणजे गोत्र ऋषींच्या शाखेंतील वंशज. गोत्रांचा विचार करतांना तें गोत्र ज्या ज्ञातीचें असेल त्या ज्ञातींतील बांधवांबद्दल ते गोत्रविचार असतात असें लक्षांत ठेवलें पाहिजे. आपल्या घराण्याची दुसऱयास ओळख पटते. प्रवर - गोत्र ऋषींना कुलप्रमुख म्हणतात. कुलप्रमुखाचे हाताखाली कुलांत यज्ञ संस्थेचें काम करणारे किंवा अध्यापन करणारे जे ऋषि असतात त्यांना प्रवर संज्ञा पडली आहे. विवाहप्रसंगीं, गुरूंना अभिवादन करतांना आणि यज्ञकर्मांत गोत्राचा व प्रवरांचा उच्चार करावा लागतो.
गोत्र म्हणजे कुल. गोत्र ऋषि म्हणजे कुलप्रमुख. प्रवर ऋषि म्हणजे पौरोहित्य किंवा अध्यापन करणारे गुरु. कुलस्वामी व ग्रामदेवता
कुलस्वामी - या शब्दाचा अर्थ कुलावर कृपादृष्टि ठेवणारा, कुलाचा रक्षण करणारा असा आहे. कुलस्वामी, कुलदैवत व कुलदेवता हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात. कुलस्वामी देवकोटींतील असतो लग्नमौंजीसारख्या शुभकार्यांत कुलस्वामी व कुलस्वामिनी यांची आराधना करतात. त्यांना नैवेद्य दाखवितात व तो प्रसाद म्हणून भक्षण करतात. ग्रामदेवता ह्या गांवच्या मूळ रहिवाशांच्या देवता आहेत व्रतें - विशिष्ट देवतेचीं विशिष्ट पद्धतीनें मुदतवार आराधना करून केलेल्या पूजनास व पालनास व्रत म्हणतात. कुलामध्यें कुलाचाराप्रमाणें वंशपरंपरा चालवावयाचीं व्रतें नसतात. ठराविक
वर्षाच्या पालनानंतर उद्यापन करून व्रतांची सांगता होते. कुलाचार व व्रत यांत हा मोठा फरक आहे.