"परमेश्वर"
परमेश्वर जरी एक असला, तरी प्रत्येकातील पंचमहाभूतांचे घटक, त्रिगुणांचे प्रमाण, संचित आणि प्रारब्ध कर्मे, लिंगदेहातील घटकांचे प्रमाण इत्यादी निरनिराळे असल्याने प्रत्येकाने कोणत्या देवतेची (देव किंवा देवी) उपासना केली की, तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, हे निरनिराळे आहे. त्यामुळे हिंदु धर्मात बर्याच देवता आहेत. प्राणिमात्रांतच काय तर निर्जीव गोष्टींतही परमेश्वराचे अस्तित्व असल्यामुळे हिंदु धर्मात देवतांची संख्या पुष्कळ तेहेतीस कोटी आहे. आवश्यक त्या देवतेची उपासना केल्याने साधकाची उन्नती लवकर होऊ शकते, हे केवळ हिंदु धर्मातच साध्य होऊ शकते.